
आत्मा मालिक बालसंस्कार शिबिराचे उपप्रकार
आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर 2023 ची उद्दिष्ट्ये
ध्यान-योगाच्या मार्गाचे आचरण करुन प्रत्येकाचे अंतरगी नांदणाऱ्या परमेश्वराची ओळख करुन घेण्यासाठी ध्यानाची कला विद्यार्थ्याना शिकविणे. प्राचिन भारतीय गुरु शिष्य परंपरेचे दर्शन घडविणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य, परोपकाराची भावना रुजविणे.
शालेय जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे क्रीडा! खेळाशिवाय जीवन हे कंटाळवाणे असते. व विद्यार्थ्याची प्रगती अपेक्षित नाही. म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनात खेळाचे महत्व हे अनन्य साधारण आहे. यासाठी आत्मक्रीडा बालसंस्कार शिबिरात विविध खेळांचे प्रशिक्षण आयोजित केलेले आहे.
सर्व विद्यार्थ्यांना पोहता येणे फार महत्वाचे आहे. याचे पुढील फायदे आहेत. आपण स्वतःला व इतरांना बुडण्यापासून वाचवू शकतो. आरोग्य सुधारते. आत्मविश्वास वाढतो. यासाठी जलतरण शिबिराचे आयोजन केले आहे. यात विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन शालेय जलतरण स्पर्धेसाठी तयार करणे.
मन मेंदू आणि बठकट करणाऱ्या अनेक कला आहेत त्यापैकी भारतीय युध्दकलेत शिवकालीन युध्दकला जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्रांच्या जोरावर एक मावळा लाख मावळा कशी सिध्द केली याची जाणीव व ओळख करुन शिवकालीन युध्दकलेची माहिती व प्रशिक्षण देणे.
विद्यार्थ्यामध्ये संगीत विषयाची आवड निर्माण करणे संगीताचे प्राथमिक शिक्षण देणे. संगीतातील विविध गीत प्रकारांची, आत्म संगीताची ओळख करून देणे. नावाजलेल्या तज्ञ कलाकारांचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक वादनाचे पायाभूत शिक्षण मिळवून देणे. उत्तम गायना साठी आवश्यक असणाऱ्या कंठसाधनेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करवून घेणे.
भारतीय नृत्याचा उगम हा विविधतेतून झाला आहे. विद्यार्थ्यांना सर्वांगीण प्रगती व व्यक्तिमत्व विकासासाठी नृत्याचा समावेश असणे अगत्याचे आहे. फक्त समावेशच नाही तर त्यामध्ये रुची ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुभवी नृत्य दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य बालसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षित केले जाईल.
तुम्ही तुमचा लाडका पाल्य आत्मनिवेदन शिबिराला द्या आम्ही तुमच्या मनातील उत्कृष्ट निवेदक सूत्रसंचालक तुम्हाला घडवून देऊ. जसा बाळाला आईचा लळा, तशी आमची सूत्रसंचालन कार्यशाळा! शिबिरात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला निवेदन करण्याची संधी देऊन निवेदनाची प्रत्यक्ष अनुभूती देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
रांगोळी व पेपरवर्क या सारख्या कला प्रकारातून मूलांमधे एकाग्रता निर्माण करणे. कलागुणांना वाव देणे. कोरोना कालखंडात मोबाईल शाळेतून मूलांना बाहेर काढून त्याच्यातील नवनवीन अविष्कारांना वाव देणे. रांगोळी.कागदकाम या सारख्या कला प्रकारातून मूलांमधे एकाग्रता निर्माण करणे .
उत्कृष्ट संस्कारक्षम क्रिकेटपटु तयार करणे. प्रत्यक्ष खेळाची अनुभूती देणे. देशपातळीवर तसेच राज्य पातळीवर गाजलेल्या क्रिकेटपटूना प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने आमंत्रित करून त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव खेळाडुंना देणे.
स्पर्धा परिक्षा ची शालेय स्तरापासून आवड निर्माण करणे. विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, आकलनशक्ती, विश्लेषण, चौकस वृत्तीचा विकास करणे. संपूर्ण शालेय स्पर्धा परीक्षेत सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी सक्षम बनविणे. स्पर्धा परिक्षा ची शालेय स्तरापासून आवड निर्माण करणे.
नम्र व विनयशिल थोर मोठ्याचा सन्मान करणारे कुस्तीगीर तयार करणे. बलदंड व निरोगी पिढी घडवने. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीगीर तयार करणे. परमपूज्य गुरुमाऊलींच्या सानिध्यात कुस्ती प्रशिक्षण. प्रशस्त व आधुनिक मॅट हॉल व माती आखाडा यावर कुस्ती प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उत्कृष्ट बालकलाकार निर्माण करणे / अभिनयाचे तंत्र विकसित करणे. पायाभूत कौशल्यांचा विकास करणे. रंगमंचावरील आत्मविश्वास वृध्दींगत करणे. सुप्त बालकलाकारांमधील विविध कलागुण जोपासणे. सहभागी प्रत्येक बालकलाराला अभिनय करण्याची संधी देऊन अभिनयाची प्रत्यक्ष अनुभूती देणे.
प्राचीन ऋषीमुनींनी तणावमुक्त जीवन जगण्याची दिलेली नव संजीवनी म्हणजे योग. योगामुळे "स्व" ची जागरूकता वाढते, एकाग्रता वाढते, शरीर व मनस्वास्थ्य वाढून ताण व चिंता कमी होते. आत्मयोग बालसंस्कार शिबिरात योगाचे विविध प्रकार शिकविले जातील.
आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर 2023 ची वैशिष्ट्ये
आत्मज्ञान शिबिरात ज्या बालकांची लहानपणापासूनच आध्यात्मिक वृत्ती आहे, अश्या बालशिष्यास अष्टांगयोगाचा ध्यानयोगाचा मार्ग व त्यासंबंधीची साधनेचा संस्कार केल्यास तो आनंदाने स्विकारतो. अश्या बालकांच्यावर योग-ध्यान-ज्ञान-गितापठण श्लोकपठण याद्बारे बालसंस्कार शिबिरामध्ये विशेष कौशल्य शिकविलीजातील व अश्या बालकाला त्याच्यामधील आध्यात्मिक वृत्ती जोपसण्याची कला या आत्मज्ञान संस्कार शिबिरात शिकविली जाईल.
क्रीडा शिबिरात प्रत्येक खेळाडुने केलेल्या खेळाचे सुक्ष परीक्षण /निरीक्षण करून आवश्यक तेथे योग्य मार्गदर्शन केले जाईल. देशपातळीवर तसेच राज्य पातळीवर गाजलेल्या खेळाडुंना प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने आमंत्रित करून त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव खेळाडुंना दिला जाणार आहे.
जलतरण शिबिरात महाराष्ट्रातील प्रथमच इनडोअर स्विमिंग पुल (जलतरण तलाव) उपलब्ध आहे. ५ ते १२ वर्षाच्या बालकांसाठी स्पेशल बेबी पुल आहे. तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक, लाइफ गार्ड /लाईफ सेवर ची टीम उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना १० दिवसातच जलतरण शिकवले जाणार आहे.
मर्दानी खेळ शिबिरात दांडपट्याद्वारे लिंबू कापण्याचे गीनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आचार्य श्री लखन जाधव संस्थापक सव्यसाची गुरुकुलम कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मर्दानी खेळ प्रशिक्षण होणार आहे. भारतीय युध्दकलेची शिवकालीन युध्दकलेत वापरण्यात आलेल्या शास्त्रांची ओळख करुन दिली जाईल.
संगीत शिबिरात स्वर ज्ञान व गायनाचे पायाभूत शिक्षण. ट्रिपल/ कोंगो , कि - बोर्ड , पॅड. सांस्कृतीक कार्यक्रमात सादर करण्याजोगी गीते. ( समुह / एकल ). उत्तम गायना साठी आवश्यक असणाऱ्या कंठसाधनेचा शास्त्रशुद्ध अभ्यास. पाश्चात्य स्केल्स व कॉड्र्स यांची ओळख करून दिली कानार आहे.
नृत्य शिबिरात शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य हे दोन्ही नृत्यप्रकार शिकविले जाणार आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात शैक्षणिक अभ्यासाबरोबरच मानसिक तंदुरुस्तीसाठी नृत्यकाल जोपासने ही काळाची गरज आहे. कथक, भरतनाट्यम, कुचीपुडी, कथकली या शास्त्रीय नृत्य कलेबरोबरच भारतीय लोकनृत्य आणि पाश्यात्य नृत्य शैलि, बेले जाज, हिप हॉप या नृत्य कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव दिला जाणार आहे.
आत्म निवेदन शिबिरात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला निवेदन करण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने केलेल्या निवेदनाचे परीक्षण करून आवश्यक तेथे योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे. व्यावसायिक सूत्रसंचालकांना आमंत्रित करून कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे.
कला शिबिरात इयत्ता ९ वी व १० वी साठी महत्वाची असणारी शासकिय रेखाकला परीक्षेची सपूर्ण तयारी करुन घेतली जाईल. अनूभवी मार्गदर्शक शिक्षकांकडून चित्रकला प्रशिक्षण.इयत्ते नूसार वर्गाची सोय व कला प्रदर्शनातून चित्राची माहीती.
क्रिकेट शिबिरात प्रत्यक्ष सामन्यांचे आयोजन करून उत्कृष्ट खेळाडु, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, तसेच उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडु निवडले जाणार आहेत. आत्म-क्रिकेट बालसंस्कार वर्गातून तयार झालेल्या उत्कृष्ट खेळाडु विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्रिकेट सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धा पायाभूत शिबिरात स्पर्धा परीक्षेद्वारे मोठमोठ्या पदावर होणा-या नियुक्त्यांची ओळख करून दिली जाईल. नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, एन. एम. एम. एस. परीक्षा, एम.टी.एस परीक्षा तसेच एन. टी. एस. परीक्षा. बद्दल संपूर्ण माहिती व मार्गदर्शन अनुभवी व तज्ज्ञ अध्यापक वर्गाकडून केले जाईल.
मल्लविद्या शिबिरात ऑलम्पिक दर्जाच्या तीन मॅट, प्रशस्त व आधुनिक मॅट हॉल व माती आखाडा. प्रत्येक मॅटसाठी वैयक्तिक तज्ञ प्रशिक्षक.मल्लांना गिरगायीचे दुध व फळांची कुस्तीकेंद्रात व्यवस्था. कुस्ती सोबत अध्यात्माचे धडे. बालसंस्काराचे धडे. वेळोवेळी क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
अभिनय शिबिरात अभिनयाचे तंत्र विकसित करून घेतले जाईल. सहभागी प्रत्येक बालकलाराला अभिनय करण्याची संधी देऊन अभिनयाची प्रत्यक्ष अनुभूती दिली जाईल. प्रत्येक बालकलाकाराने केलेल्या अभिनयाचे परीक्षण / निरीक्षण करुन आवश्यक तेथे योग्य मार्गदर्शन केले जाईल.
योग शिबिरासाठी योग वर्गासाठी प्रशस्त हॉल उपलब्ध आहे. तसेच तज्ञ प्रशिक्षक व मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टांग योगाचा परिपूर्ण अभ्यास करवून घेतला जाणार आहे.
आत्मा मालिक बालसंस्कार शिबिरात विविध मान्यवर भेटी देणार आहेत व त्यांच्या प्रेरणदायी भाषणांचे दररोज आयोजन करण्यात आलेले आहे. आत्माविष्कार स्नेहसंमेलन, बालचित्रपट व ऑर्केस्ट्रा यांचेही आयोजन शिबिरा दरम्यान करण्यात येणार आहे.
आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर 2023 मधील सोयी सुविधा

मुली आणि मुलांचे स्वतंत्र वसतिगृह

सेमिनार हॉलमध्ये रोज ध्यानधारणा

नृत्य आणि संगीत

16 प्रकारचे इनडोअर व आउटडोअर खेळ

24 तास वैद्यकीय सुविधा

कला आणि हस्तकला

सुसज्ज ऑडिओ व्हिज्युअल लायब्ररी

300 पेक्षा जास्त सी.सी.टी.व्ही. कॅमेरे
परमपूज्य समर्थ सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपाछत्राखाली एक अध्यात्मिक व सुसंस्कारित पिढी घडवणे आणि खऱ्या अर्थाने भारताचा सुजाण नागरिक घडवणे हे या आत्मा मालिक संस्कार शिबिराचे उद्दिष्ट आहे. जवळपास तीन हजार विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या प्रदीर्घ अशा सुट्टी मध्ये काहीतरी विधायक कार्य त्यांच्या हातात देणे व त्यांच्या कलागुणांना वाव निर्माण करून देणे व संधी उपलब्ध करून देणे हि गरजेची गोष्ट आहे आणि हे कार्य हे आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर करणार आहे. प्रत्येक उपप्रकरातील संस्कार शिबिराचे स्वतंत्र वैशिष्ठ आहे व त्यामध्ये विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारचे कौशल्य आत्मसात करण्यास मिळणार आहे.
आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर
आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाने आयोजित केलेल्या आत्मा मालिक बालसंस्कार शिबिराविषयी "आत्मा मालिक न्यूज" या सुप्रसिद्ध युट्युब चॅनेल वर बातमी स्वरूपातील व्हिडीओच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घ्या
आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर 20223 ची काही निवडक क्षणचित्रे
आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर 2023 विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Ans. होय. सर्व मुला मुलींना शिबिरा दरम्यान मोफत लॉन्ड्री सुविधा उपलब्ध असणार आहे!
Ans. शिबिर सुरु होण्याच्या तारखेच्या एक दिवस आधी
Ans. वय वर्ष ६ ते वय वर्ष १५ किंवा इयत्ता 1 ली ते 8 वी
Ans. इयत्ता 1ली ते 4थी रु 12,000/- व इयत्ता 5वी ते 8वी रु 15,000/- परंतु लवकर नोंदणी केल्यास फी मध्ये आकर्षक सवलत मिळेल त्यासाठी अधीक माहिती साठी आमच्या हेल्पलाईन नंबर वर कॉल करावा
Ans. याच वेबसाईट वर एक सोपा फॉर्म दिसतो आहे त्यात आपल्या पाल्याचे पूर्ण नाव, वय व गाव किंवा शहर नमूद करून सबमिट हे बटन दाबले कि ठराविक वेळेत आपण दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉल करून आम्ही पुढील प्रक्रीये बद्दल मार्गदर्शन करू. फॉर्म भरण्या ऐवजी आपण आमच्या ग्राहक सेवा केंद्र क्रमांक 7058023355 वर कॉल करूनही नोंदणी करू शकता.
Ans. हो. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या परिसरात भव्यदिव्य व सुसज्ज असे मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे.
Ans. आत्मा मालिक बालसंस्कार शिबिरामध्ये एकूण १३ (तेरा) वेगवेगळे शिबिरे आहेत. एक विद्यार्थी कोणत्याही एकाच शिबिरात सहभाग घेऊ शकतो. पण तरीही आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला इतरही शिबिराचा थोडा थोडा अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Ans. आत्मा मालिक बालसंस्कार शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा पहाटे ०५:३० ते रात्री ०९:३० अनेकविध उपक्रमांचा अत्यंत सुनियोजित असा दिनक्रम निश्चित केलेला आहे.
Ans. आत्मा मालिक अध्यात्मिक ध्यानपीठ संचालित आत्मा मालिक हॉस्पिटल (साईबाबा मेडिकल) मध्ये योग्य तो उपचार केला जाईल. पालक विद्यार्थ्यांना मधूनच घेऊन जाण्यास इच्छुक असतील तर सदर विद्यार्थ्यास पालकांकडे सोपवले जाईल.
Ans.मुलांची व मुलींची राहण्याची व्यवस्था स्वतंत्र आहे. मुली व पहिली ते तिसरी पर्यंत चे लहान मुले यांची व्यवस्था आत्मा मालिक ध्यानपीठ पाठीमागे सुसज्य व भव्य असे गर्ल्स होस्टेल आहे त्यात केलेली आहे. व मुलांची राहण्याची व्यवस्था इंटरनॅशनल स्कूल बॉईज होस्टेलमध्ये केलेली आहे. तर मुलामुलींची जेवणाची व्यवस्था इंटरनॅशनल स्कूलच्या भव्यदिव्य प्रसादलायत असेल.
Ans. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, आत्मा मालिक अध्यात्मिक ध्यानपीठ, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, शिर्डी कोपरगाव रोड, मु. कोकमठाण, पो. जेऊर कुंभारी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, पिन कोड ४२३६०१
Ans. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल हे शिर्डी पासून कोपरगाव च्या दिशेने नगर मनमाड हायवेवर ५ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. शिर्डी ला देशभरातून अनेक खाजगी Travel बसेस सुरु असतात. तसेच कोकमठाण हे कोपरगाव व शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशन पासून खूपच जवळ आहे. शिर्डी (काकडी) विमानतळहि नजीकच आहे.
Ans. मुलामुलींसाठी स्वतंत्र होस्टेल.
रुचकर भोजन व्यवस्था पुरवणारे भव्य प्रसादालय.
संकुलात अनेक ठिकाणी बसवलेले शुद्ध पाणी पुरवणारे आर. ओ. सिस्टीम.
सर्व संकुल व शिबिर परिसर ३०० पेक्षा जास्त सी.सी.टी.व्ही. च्या निगराणीत.
शांत, अध्यात्मिक व निसर्गरम्य परिसर. भव्य क्रिकेट ग्राउंड.
मोठ्ठा स्विमिंग पूल व अत्याधुनिक जिम, सर्व शिबिर प्रकारात तज्ञ प्रशिक्षक.
राज्यभरातील अनेक मान्यवरांचे नियोजित व्याख्याने, पालकांसाठी एक दिवस शिबिरात मोफत भोजन व निवास सुविधा व उद्बोधन प्रशिक्षण. योगवर्गासाठी प्रशस्त हॉल ई.
Ans. शिबिरार्थी विद्यार्थी मुलामुलींना मोबाईल वापरास परवानगी नाही. ठराविक मुला मुलींचा एक गट करून त्यांना स्वतंत्र हाउस टीचर नेमून दिले जातील व त्यांचे मोबाईल नंबर पालकांना दिले जातील. त्यावर पालक संपर्क करू शकतात. किंवा शिबिरार्थी विद्यार्थी हाउस टीचर ला विनंती करून हाउस टीचरच्या फोन वरून पालकांच्या फोनवर संपर्क करू शकतात.
Ans. शिबिरामध्ये संपूर्ण भारतातील मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषा जाणणारे मुले मुली सहभागी होऊ शकतात.
Ans. हो! शिबिरात सहभागी मुलांच्या आई व वडिलांसाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Ans. होय! शिबिरा दरम्यान सर्व मुला मुलींना एक वेळ मोफत हेअर कट सुविधा उपलब्ध असणार आहे..
Ans. होय!
1. जलतरण म्हणजेच स्विमिंग मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुला मुलींसाठी स्विमिंग कीट मोफत
2. क्रिकेट शिबिर साठी कॅप, टी शर्ट व प्रॅक्टिस कीट मोफत
३. सर्व मुला मुलींसाठी स्पोर्ट्स शूज, स्पोर्ट्स ड्रेस, टी शर्ट व कॅप मोफत
Ans..आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाने स्वतः “आत्मा मालिक डेबिट कार्ड” सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या कार्डवर पालक मुलांच्या नावे पैसे पाठवू शकतात. या “आत्मा मालिक डेबिट कार्ड वरून विद्यार्थी स्वतःचा अल्पोपहार गृह खर्च, फन फेयर खर्च किंवा इतर खरेदी करू शकतात. याविषयी अधिक तांत्रिक माहिती साठी आमच्या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा!
Ans. शिबिराचे संचालन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष माजी उपजिल्हाधिकारी मा. श्री. नंदकुमार पांडुरंग सूर्यवंशी साहेब यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली सुरु राहील.
आत्मा मालिक बालसंस्कार शिबिराचे मार्गदर्शक


मा.श्री.आण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक


मा.श्री. पोपटराव पवार
सरपंच, हिवरे बाजार


मा.श्री. मंडलिक साहेब
आय.पी.एस.


मा.श्री. प्रकाश खांडेकर
निवृत्त कर्नल, संस्थापक अध्यक्ष इगल अकॅडमी, पुणे


मा.श्री. संजयजी कळमकर
प्रसिध्द व्याख्याते


मा.सौ. भाग्यश्री बानायत
आय.ए.एस.


अंजली गायकवाड
इंडियन ऑयडॉल फेम


मा.श्री. शिवप्रसाद महाले
प्रसिध्द व्याख्याते


मा.श्री. संजय मालपणी
प्रसिध्द व्याख्याते व उद्योजक


ह.भ.प.तनपुरे महाराज
शिव व्याख्याते


रिअर ॲडमिरल पी.डी. शर्मा
ए.व्ही.एस.एम. एम.एम., आय.एन. निवृत्त - संस्थापक अध्यक्ष आर.एल.एस.एस.


मा. श्री. गणेश शिंदे
प्रसिध्द व्याख्याते


मा.डॉ. इंद्रजित देशमुख
निवृत्त आय.ए.एस.


ह.भ.प.चैतन्य राऊत महाराज
आळंदी बालकिर्तनकार


ह.भ.प. नयनाताई साळवे
किर्तनकार


स्मृती मंधाना
महिला क्रिकेटर, भारतीय महिला संघ


मा.श्री. लखन जाधव
अध्यक्ष, सव्यसाची गुरुकुल


आत्मा मालिक ध्यानपीठ संत परिवार
ध्यान योगा बालसंस्कार मार्गदर्शन


मा.श्री. भास्करराव पेरे

